मुंबई

प्रवाशाला जिवंत काडतुसासह आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक

नवशक्ती Web Desk

मुंबई : जिवंत काडतुसासह एका प्रवाशाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरपोर्ट पोलिसांनी अटक केली. उमेश रामवक्ष गौड असे या प्रवाशाचे नाव असून त्याच्या बॅगेतून पोलिसांनी चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध आर्म्स ॲॅक्ट कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

विश्‍वेंद्र राजेंद्र सिंग हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात (सीआयएसएफ) उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमातळावर आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता ते कामावर रुजू झाल्यानंतर दुपारी १२ वाजता प्रवाशांच्या बॅग तपासत असताना, एका बॅगमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या बॅगेची तपासणी केली असता त्यात त्यांना ०.३८० एमएम बनावटीचे चार जिवंत काडतुसे सापडली. या बॅगेचा मालकाचा शोध घेतला असता, ती बॅग उमेश गौड याची असल्याचे आढळले. होती. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला उमेश सध्या घाटकोपर येथील जनतानगर गोपाळ चाळीत राहतो. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तो स्पाईसजेट विमानाने मुंबईहून गोरखपूरला जाण्यासाठी विमानतळावर आला होता. त्याच्याकडे सापडलेल्या जिवंत काडतुसाबाबत विचारणा केल्यानंतर त्याला काही सांगता आले नाही. त्यामुळे त्याला चारही जिवंत काडतुसासह विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी विश्‍वेंद्र सिंग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी उमेश गौडविरुद्ध जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत त्याला पोलिसांनी अटक केली.

का वाढेना मतदानाचा टक्का?

जपायला हवा, दाभोलकरांचा वारसा

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?