मुंबई

पेडणेकर यांना दिलासा कायम

Swapnil S

मुंबई : कथित जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तसेच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मंगळवारी मुंबई हायकोर्टाने अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवला. तसेच न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी पेडणेकर यांच्या अटकपूर्व जामीनअर्जाची सुनावणी १४ फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली.

कोरोना महामारीत बॉडी बॅगची चढ्या दराने खरेदी केली. त्या माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह काही पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तथापि, या प्रकरणात आपल्याला नाहक गोवले आहे, असा दावा करत पेडणेकर यांनी अ‍ॅड. राहुल अरोटे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज गेल्या आठवड्यात सत्र न्यायाधीश एस. बी. जोशी यांनी अर्ज फेटाळून लावला. त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात आव्हान देत अटकपूर्व जामीनासाठी याचिका केली. याचिकेवर न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिकेची सुनावणी १४ फेब्रुवारीला निश्‍चित केली. तोपर्यंत पेडणेकर यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नका, असे निर्देश हायकोर्टाने तपास यंत्रणांना दिले

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक