मुंबई

पोलीस अधिकार्‍याच्या डॉक्टर मुलीची फसवणुक कुर्ला येथील घटना; सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

हा प्रकार लक्षात येताच तिने नेहरुनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अनिल शर्मा नाव सांगणार्‍या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे

प्रतिनिधी

मुंबई - पोलीस अधिकार्‍याच्या तीस वर्षांच्या डॉक्टर मुलीची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केली. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तक्रारदार तरुणी ही डॉक्टर असून तिचे वडिल पोलीस खात्यात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ती सध्या घरातूनच ऑनलाईन मेडीकल कोर्स करत आहे. २५ नोव्हेंबरला तिला एका अनिल शर्मा नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने तिच्या वडिलांची चौकशी करुन त्यांची एलआयसी पॉलिसी मॅच्युरड झाली आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करायची आहे. याच दरम्यान तिच्या खात्यात दहा हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचा एक मॅसेज आला होता. या व्यक्तीने उर्वरित रक्कम लवकरच पाठवितो असे सांगून तिचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने अडीच हजारऐवजी तिला पुन्हा २५ हजार रुपये पाठविले.

काही वेळानंतर त्याने चुकून जास्त पैसे तुमच्या खात्यात जमा झाले असून ही रक्कम त्याला परत पाठवा अशी विनंती करताना त्याने एका बँक खात्याची डिटेल्स दिली होती. त्यामुळे तिने त्याला २२ हजार ५०० रुपये पाठवून दिले, मात्र ही रक्कम ट्रान्स्फर झाली नाही. त्यामुळे त्याने तिला दुसरा युपीआय आयडी पाठविला होता. तिथे तिने २६ हजार रुपये पाठवून दिले. अशा प्रकारे त्याने तिला सुमारे एक लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. मात्र तिने पाठविलेल्या पैशांचे मॅसेज तिला बँकेतून आले नव्हते किंवा संबंधित व्यक्तीने पाठविलेली रक्कम तिच्या खात्यात जमा झाली नव्हती. त्याने केवळ पैसे पाठविल्याचा मॅसेज पाठवून तिची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच तिने नेहरुनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अनिल शर्मा नाव सांगणार्‍या अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारतावर आता ५०० टक्के टॅरिफ? ट्रम्प प्रशासन 'रशियावरील निर्बंध' विधेयकाद्वारे पुन्हा झटका देण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; “मुंबईचा महापौर मराठी हिंदू...

"हॉटेलमध्ये बोलावले अन्..."; अल्पवयीन नेमबाज युवतीचा राष्ट्रीय प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Mumbai : कांदिवलीमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक; भावाला अटक, बहीण फरार

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे जाणार 'बिग बॉस'च्या घरात? अभिनेत्याने स्वतःच सांगितलं, "लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात"