मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानात पसरलेल्या धुळीबाबत पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे येत्या महिन्याभरात उपाययोजना केली नाही, तर मैदानातील माती पालिकेच्या कार्यालयासमोर आणून टाकू, असा इशारा मनसेने पालिका प्रशासनाला दिला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी मैदानाची पाहणी केली आणि यासंदर्भात सूचना केल्या.
अतिरिक्त थर काढणार - सावंत
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी मैदानाची पाहणी केली आणि यासंदर्भात सूचना केल्या. तसेच शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त करण्यासाठी मैदानातील मातीचा अतिरिक्त थर काढून मैदान समतोल करण्यात येणार असल्याचे महेश सावंत यांनी सांगितले.