पवईत सेप्टिक टँकमध्ये एका कामगाराचा मृत्यू; आणखी एक गंभीर जखमी प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

पवईत सेप्टिक टँकमध्ये एका कामगाराचा मृत्यू; आणखी एक गंभीर जखमी

पवईतील हिरानंदिनी हॉस्पीटलसमोरील राज ग्रँडर डोई इमारतीत बुधवारी सकाळी सेप्टिक टँक साफ करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सेप्टिक टँक साफ करण्यासाठी ३ कामगार खाली उतरले असताना टँकमधील वायूमुळे ते गुदमरून खाली पडले.

Swapnil S

मुंबई : पवईतील हिरानंदिनी हॉस्पीटलसमोरील राज ग्रँडर डोई इमारतीत बुधवारी सकाळी १०.४२ वाजताच्या सुमारास सेप्टिक टँक साफ करत असताना एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सेप्टिक टँक साफ करण्यासाठी ३ कामगार खाली उतरले असताना टँकमधील वायूमुळे ते गुदमरून खाली पडले. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पवई हिरानंदानी येथील राज ग्रँडर डोई या गगनचुंबी इमारतीतील जमिनीखालील सेप्टिक टँक साफ करण्यासाठी बुधवारी सकाळी ३ कामगार आले होते. सफाईचे काम करत असताना आतमध्ये असलेल्या वायूमुळे दोन कामगार चक्कर येऊन खाली पडले. यामधील एका कामगाराचा मृत्यू झाला. तर दुसरा कामगार फुलचंद कुमार (वय २८) याची प्रकृती चिंताजनक आहे. तर तिसरा कामगार टाकीच्या अर्ध्या वाटेतून वेळीच बाहेर आल्यामुळे त्याचे प्राण वाचले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कामगारांना बाहेर काढले. त्यावेळी दोन्ही कामगारांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना तत्काळ हिरानंदानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारादरम्यान एकाला मृत घोषित केले. या अपघाताची पुढील चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमध्ये बचावलेल्या एका कामगाराने सांगितले की, सेप्टिक टँक सफाई करण्यासाठी आधी एक कामगार खाली उतरला. तो बराच वेळ बाहेर आला नाही त्यामुळे दुसरा कामगार खाली उतरला. पण दोघेही आतमध्ये पडले. दोन्ही कामगार बाहेर येत नसल्यामुळे मीदेखील खाली उतरत होतो, पण मी अर्ध्यातूनच बाहेर आलो.

Mumbai : काँक्रीटीकरणाला डेडलाईन; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश

"घाण नका करू... हे भारत नाहीये"; नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांना सुनावलं; गुटखा थुंकल्यानंतर रस्ता साफ करून घेतला, Video व्हायरल

ठाण्यात भटक्या श्वानांचा त्रास वाढला; ॲनिमल हेल्पलाइनवर १५८ तक्रारी

Pune : दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत होता… आईनेच घेतला ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; स्वतःच दिली कबुली

Mumbai : अखेर मेट्रो ९ सुरू! पहिल्या प्रवाशाची भावनिक प्रतिक्रिया; 'हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील'; Video