मुंबई

मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात रक्षाबंधन पारंपरिक पद्धतीने साजरा

मुंबई व ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असतानाही रक्षाबंधनाचा उत्साह जोरात होता.

प्रतिनिधी

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधन हा सण मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

मुंबई व ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असतानाही रक्षाबंधनाचा उत्साह जोरात होता. आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी महिला वर्ग सकाळपासूनच सज्ज झाला होता. लोकल गाड्यांना नेहमीपेक्षा मोठी गर्दी होती. बस, खासगी गाड्यांतून बहिण-भाऊ एकमेकांना भेटण्यासाठी निघाले होते. चिमुकले भाऊ-बहिणी एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झाले होते. आपल्या लाडक्या भावासाठी राखी घ्यायला दुकानांमध्ये झुंबड उडाली होती. तसेच मिठाईच्या दुकानातही गर्दी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधान भवनातील महिला पोलीस कॉन्स्टेबलनी राखी बांधली.

तसेच ठाणे मेंटल रुग्णालयातील रुग्णांना स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी राख्या बांधल्या. रुग्णांना राख्या बांधताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले. तर सेंट्रल जेलचे अधीक्षक हर्षद अहिरराव म्हणाले की, तुरुंगातील कर्मचाऱ्यांनीही हा सण साजरा केला. ठाणे जिल्हा रुग्णालयात स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी रुग्णांना फळांचे वाटप केले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस