मुंबई

Mumbai : राणी बाग येत्या बुधवारी सुरू राहणार; गुरूवारी मात्र बंद

मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी सुरू राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे येत्या बुधवारी राणी बाग सुरू राहणार आहे.

Swapnil S

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे या दिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणी बाग जनतेकरिता सुरू राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी राणी बाग पर्यटकांसाठी बंद असेल, असे मुंबई पालिकेकडून सांगण्यात आले.

भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी सुरू राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते. त्यामुळे येत्या बुधवारी राणी बाग सुरू राहणार आहे.

भारताची मोठी कामगिरी; कल्पक्कममध्ये जगातील पहिला अणुभट्टीच्या उष्णतेवर चालणारा हायड्रोजन प्रकल्प सुरू

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

ठाण्यात ४० टक्के पाण्याची गळती; आमदार संजय केळकर यांचा आरोप

Mumbai : उच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्याला २५ हजारांचा दंड; FIR ची प्रत नाकारणे अधिकाऱ्याला भोवले