मुंबई

गणेशोत्सवात भक्तांना दिलासा ; तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी नो ब्लॉक

विविध कामांसाठी दर रविवारी घेण्यात येणारा मेगा ब्लॉक रविवार २४ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आला आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई : विविध कामांसाठी दर रविवारी घेण्यात येणारा मेगा ब्लॉक रविवार २४ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसह गणेश भक्तांना दिलासा मिळाला आहे.

गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वे रविवार २४ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण सेक्शन मेन लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल हार्बर लाईनसह ट्रान्स-हार्बर लाईन आणि बी एस यू लाईन उपनगरीय सेक्शनवर मेगा ब्लॉक रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक!

बोरिवली - भाईंदर स्थानकादरम्यान जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.३० ते रविवार पहाटे ४.३० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कालावधीत बोरिवली - भाईंदर स्थानकादरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

गुरुवारी चर्चगेट मुंबई सेंट्रल दरम्यान थांबा !

गुरुवार २८ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे विसर्जन होणार आहे. या दिवशी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सायंकाळी ५ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत दरम्यान लोकल थांबतील. तर चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या लोकल चर्नी रोड स्थानकांत थांबणार नाही.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी