मुंबई

अमेरिकेतील व्याजदरवाढीवर शेअर बाजारांची दिशा ठरणार

विदेशी फंड हाऊसचा कल, रुपयाची अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या किमती हेही बाजाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार

वृत्तसंस्था

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरवाढीबाबत होणारा निर्णय आणि मे महिन्यातील महागाईची आकडेवारी पुढील आठवड्यात शेअर बाजारांची दिशा ठरवेल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. याशिवाय विदेशी फंड हाऊसचा कल, रुपयाची अस्थिरता आणि कच्च्या तेलाच्या किमती हेही बाजाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहेत.

स्वस्तिका इन्व्हेस्टमार्ट लि. चे रिसर्च हेड संतोष मीणा यांनी म्हटलं की, सर्वांच्या नजरा फेडरल रिझर्व्हच्या फेडरल फ्री मार्केट कमिटी १५ जूनच्या निर्णयाकडे असतील. महागाईच्या दरम्यान व्याजदरातही वाढ होण्याची अपेक्षा बाजाराला आहे. बँक ऑफ जपान देखील १७ जून रोजी आपला आर्थिक आढावा सादर करेल. मीना यांनी पुढे म्हटलं की, जागतिक शेअर बाजारातील विक्रीच्या काळात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा (एफआयआय) दृष्टिकोन काय राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

एफआयआय गेल्या सलग आठ महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर विक्री करत आहेत. देशांतर्गत आघाडीवर, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) १३ जून रोजी आणि घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) महागाई दराची आकडेवारी १४ जून रोजी जाहीर होईल. याशिवाय रुपया आणि कच्च्या तेलाच्या चढउतारांवरही लक्ष असेल.

बाजारातील अस्थिरता कायम राहील

रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले की, या आठवड्यात आगामी डेटा आणि महत्त्वाच्या घडामोडींमुळे बाजार अस्थिर राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील महागाईने ४० वर्षांचा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर आयआयपीची आकडेवारी जाहीर झाली.

जागतिक आघाडीवर १५ जून रोजी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या बैठकीतील व्याजदरवाढीबाबत निर्णय येईल. विश्‍लेषकांनी सांगितले की, जागतिक चलनवाढीमुळे बाजारावर प्रचंड दबाव आहे. अशा स्थितीत रिझर्व्ह बँकांकडून पावले उचलणे अपेक्षित आहे.

आरक्षणाच्या राजकारणात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

नरेंद्र मोदी : उच्चभ्रू राजकीय वर्गाला आव्हान देणारे लोकनायक

आजचे राशिभविष्य, २२ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार