TMC
मुंबई

मुंबईत २९१ ठिकाणी दरडींचा धोका, रहिवाशांसाठी संरक्षक भिंत उभारणार; पालिका ११५ कोटी रुपये खर्च करणार

भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी मालाड या मुंबई उपनगरातील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम असून याठिकाणी २२ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करत आहेत.

Swapnil S

मुंबई : भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी मालाड या मुंबई उपनगरातील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम असून याठिकाणी २२ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करत आहेत. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून संरक्षक भिंत बांधण्यासह रहिवाशांचे पुनर्वसन व स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी ११५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

मुंबईत २९१ ठिकाणी दरडींचा धोका असून त्यातील २०० हून अधिक ठिकाणे ही कुर्ला ते मुलुंड पश्चिम पर्यंतच्या भागात आहेत. विक्रोळी, भांडूपपर्यंत १३२, घाटकोपरमध्ये ३२ ठिकाणे धोकादायक आहेत. कुर्ला येथे १८ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. मुलुंड येथील ५ ठिकाणे, देवनार परीसरात ११, मालाडमध्ये १८ आणि मलबार हिल, ताडदेव परिसरात १६ अशी धोकादायक ठिकाणे आहेत.

जिल्हाधिकारी आणि पालिकेने ही ठिकाणे निश्चित केली असून ही ठिकाणे आता संरक्षित केली जाणार आहेत. आवश्यक असेल त्या झोपडीधारकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. आवश्यक तेथे संरक्षक भिती बांधल्या जाणार आहेत. मात्र हे काम पावसाळ्यानंतर लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. 

येथे आहे धोका

  • घाटकोपर – ३२

  • कुर्ला - १८

  • मुलुंड - ५

  • देवनार – ११

  • मालाड – १८

  • मलबार हिल – १६

९६०० झोपड्यांचे होणार स्थलांतरमुंबईतील २९१ ठिकाणे ही डोंगराळ भागातील धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अजूनही २२,४८३ झोपड्यांपैकी ९,६५७ झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांचे पूनर्वसनही टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे.

NEET पुनर्परीक्षेपूर्वी Telegram वरील बंदी कायम; दिल्ली उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

उरण तालुक्यात भीषण पाणीटंचाई; रानसई आणि पुनाडे धरणांनी गाठला तळ, अनेक गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी

Kalyan-Dombivli : अतिधोकादायक इमारतीतच KDMC चा आपत्कालीन कक्ष; कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Pune : धरणांत १४ टक्के पाणीसाठा; पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे हाल होणार

सायबांच्या वाहनांना रेड कार्पेट! ब्रिटनच्या वाहनांना भारतात सवलत