मुंबई

पश्चिम उपनगरातील रस्‍ते होणार टिकाऊ व मजबूत

सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांसाठी १७८ कोटींचा खर्च

प्रतिनिधी

मुंबई: पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते करण्यावर भर दिला आहे. पश्चिम उपनगरातील रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्यात येणार असून, यासाठी मुंबई महापालिका तब्बल १७८ कोटी रुपये खर्चणार आहे. मे. आर. जी. शाह इन्फ्राटेक कमला (जे.व्ही.) कंपनीला हे काम दिले असून, पश्चिम उपनगरातील लोकांना टिकाऊ व मजबूत रस्ते मिळणार, असा विश्वास पालिकेच्या रस्ते विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

महापालिकेने पश्चिम उपनगरे येथील परिमंडळ ४ मधील पी - उत्तर व परिमंडळ ७ मधील आर -दक्षिण विभागातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण व काँक्रीट पॅसेजमध्ये आणि साईड स्ट्रीपची काँक्रीट पॅसेजमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ, संस्थांद्वारे विविध कामांसाठी खड्डे खणणे, पाणी साचून राहणे, जलवाहिन्यांची गळती आदीमुळे हे रस्‍ते खराब झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधींकडून रस्त्यांच्या सुधारणेची मागणी केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन रस्ते मजबुतीकरण व सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुनर्बांधणी व तयार केलेले रस्ते चांगल्या स्थितीत राहावेत याकरिता काम पूर्ण झाल्यानंतर ८० टक्के रक्कम अदा करून उर्वरित २० टक्के रक्कम ही संबंधित रस्ते कामाच्या दोष-दायित्व कालावधी पूर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहे. ठेकेदारांनी रस्ते तयार करताना दर्जा व गुणवत्ता राखावी, रस्त्यांवर दोष-दायित्व कालावधीमध्ये कोणत्याही त्रुटी निर्माण होऊ नयेत, रस्त्यांच्या परिरक्षणावर खर्च होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या प्रकारचे रस्ते उपलब्ध होणार आहेत. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता उत्कृष्ट राखण्याकरिता गुणवत्ता निरीक्षक संस्था (क्यू.एम.ए.) यांची नेमणूक करण्याची तरतूद टेंडरमध्ये अंतर्भूत करण्यात आली आहे. सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचा दोष-दायित्व कालावधी १० वर्षे इतका असेल, अधिकाऱ्याने सांगितले.

मे. आर. जी. शाह इन्फ्राटेक कमला कंपनीला कंत्राट

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिल्यानंतर मुंबई महा पालिकेने रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. पश्चिम उपनगरांतील रस्ते मजबूत व खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे रस्ते केले जाणार आहे. पश्चिम उपनगरातील पी - उत्तर व आर दक्षिण विभागातील रस्‍त्यांमध्ये सुधारणा, सिमेंट काँक्रिटीकरणचे काम हाती घेतले जाणार आहे. रस्ते विभागाने रस्‍ते सुधारणा कामासाठी १५५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. यासाठी ई टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याला पाच ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. ठेकेदार मे. आर. जी. शाह इन्फ्राटेक कमला (जे.व्ही.) यांनी कार्यालयीन अंदाजापेक्षा कमी दराची बोली लावल्याने त्यांना हे काम देण्यात आले आहे.

BMC Election 2026 : भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर मुंबईसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी?

BMC Election 2026 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एबी फॉर्मचे वाटपही सुरु

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

Unnao rape case : सर्वोच्च न्यायालयाचा दणका; तुरुंगातच राहणार माजी भाजप आमदार कुलदीप सेंगर; जामिनाला स्थगिती

Nagpur : बायकोच्या आत्महत्येनंतर नवऱ्याने घेतला गळफास; आईचाही आत्महत्येचा प्रयत्न, नक्की काय घडलं?