सैफ अली खान हल्ला प्रकरण; मुंबई पोलिसांनी नोंदवला पश्चिम बंगालमधील महिलेचा जबाब; याच महिलेकडून आरोपीने... संग्रहितछायाचित्र
मुंबई

सैफ अली खान हल्ला प्रकरण; मुंबई पोलिसांनी नोंदवला पश्चिम बंगालमधील महिलेचा जबाब; याच महिलेकडून आरोपीने...

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधील महिलेचा जबाब नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी सिम कार्ड खरेदीसाठी या महिलेच्या आधारकार्डचा वापर केला होता.

Kkhushi Niramish

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांनी पश्चिम बंगालमधील महिलेचा जबाब नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी सिम कार्ड खरेदीसाठी या महिलेच्या आधारकार्डचा वापर केला होता. तसेच पोलिसांनी पढील तपासासाठी सैफ अली खानच्या रक्ताचे नमुने आणि कपडे तपासासाठी गोळा केले आहेत.

फ्री प्रेस जर्नलच्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यावर त्याच्या राहत्या घरात 16 जानेवारीच्या (गुरुवार) पहाटे प्राणघातक हल्ला झाला होता. मुंबई पोलिसांनी घटनेतील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली. हा आरोपी बांग्लादेशी बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचे चौकशीत पुढे आले होते.

या प्रकरणाचा अधिक तपास करताना आरोपीने मोबाईल सिम कार्ड कसे खरेदी केले याचा तपास पोलिसांनी केला. यामध्ये आरोपीने एका बांग्लादेशी महिलेच्या आधारकार्डचा वापर करून मोबाईल सिमकार्ड खरेदी केल्याचे समोर आले.

मुंबईहून एक पथक पश्चिम बंगालला गेले आणि त्यांनी दोन व्यक्तींचे जबाब नोंदवले. यामध्ये ज्या महिलेचे आधारकार्ड वापरण्यात आले आहे तिचा जबाब घेतला असून आरोपीच्या पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या नातेवाईकाचाही जबाब नोंदवला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या नातेवाईकाच्या मदतीने आरोपीने महिलेकडून आधारकार्ड मिळवले आणि नंतर त्याने सिम कार्ड खरेदी केले.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या चौकशीचा भाग म्हणून तपासासाठी त्याचे रक्ताचे नमुने आणि कपडे गोळा केले आहेत.

घटनेविषयी गोंधळ निर्माण करू नका - फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले की, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानशी संबंधित अलिकडच्या चाकूहल्ल्याच्या घटनेबाबत गोंधळ निर्माण करू नये. ते पुढे म्हणाले, "या प्रकरणात, पोलिस योग्यरित्या तपास करत आहेत. पोलिसांकडे या प्रकरणाशी संबंधित जवळजवळ सर्व माहिती आहे. पोलिस हे प्रकरण तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवतील. त्यानंतर मुंबई पोलिस आयुक्तांना मी आज, उद्या किंवा कोणत्याही दिवशी तुम्हाला या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यास सांगेन," असे फडणवीस म्हणाले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश