@ANI
मुंबई

"राजकीय लोकांच्या अट्टाहासामुळे..." महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील घटनेवरून संजय राऊतांचा घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र भूषण सोहळ्यामध्ये घडलेल्या दुर्दैवी घहटनेवरून साधला शिंदे - फडणवीस सरकारवर निशाणा

नवशक्ती Web Desk

काल ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई येथील खारघरमधील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर भरदुपारी रंगलेल्या या सोहळ्यानंतर उष्माघातामुळे १२ श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आज संजय राऊत म्हणाले की, "धर्माधिकारी कुटुंबाला आम्ही मानतो. पण, राजकीय कुरघोडी करण्यासाठी श्री सदस्यांना तासंतास बसून ठेवले. हा सोहळा संध्याकाळी पण ठेवता आला असता. पण, अमित शहांनी दुपारची वेळ दिली म्हणून तो सोहळा रखरखत्या उन्हामध्ये ठेवण्यात आला. या सोहळ्यामध्ये फक्त व्हीआयपी लोकांचा विचार केला गेला. पण ६ तासांहुन अधिक काळ श्री सदस्य बसून होते. त्यांचा कुठलाही विचार सरकारने केला नाही. राजकीय लोकांच्या अट्टाहासामुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे." अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

महिला डॉक्टरचा हिजाब ओढला; नितीश कुमारांवर टीकेची झोड, "तुमची तब्येत ठीक नसेल तर...

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?