मुंबई

मुलीकडून वडिलांना मानसिक त्रास

गेल्या १० वर्षांपासून त्यांचा त्यांच्याच मुलीकडून प्रचंड मानसिक व शारीरिक शोषण सुरू होते

नवशक्ती Web Desk

पित्याला मानसिक व शारीरिक त्रास देणार्‍या मुलीविरुद्ध सांताक्रुज पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पूजा मेहरा असे ४८ वर्षीय मुलीचे नाव असून तिची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. क्रिशन मेहरा (८१) हे सांताक्रुझ येथे राहत असून त्यांच्या टेक्सटाईल्स प्रिटींगचा व्यवसाय होता. त्यांच्या पत्नीचे २००५ साली कॅन्सर या आजाराने निधन झाले होते. त्यांना राजा नावाचा एक मुलगा असून तो त्याच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथे राहतात, तर त्यांची अविवाहीत मुलगी पूजा (४७) ही त्यांच्यासोबत राहते.

दोन्ही मुलांचे शिक्षणासह त्यांना स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुलगा वेगळा राहण्यासाठी गेल्यानंतर त्याला सोने आणि काही रक्कम त्यांच्या प्रॉपटीतून दिली होती. पूजाने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले असून तिला उच्च शिक्षणासाठी लंडन येथे पाठविले होते. तरीही पूजा ही काहीच काम करत नव्हती. त्यांच्याच पैशांवर उधळपट्टी करत होती. अनेकदा पैशांवरुन ती तिच्या वडिलांना मारहाण करत होती. घरातील नोकरांशी क्षुल्लक कारणावरुन वाद घालत होती. गेल्या १० वर्षांपासून त्यांचा त्यांच्याच मुलीकडून प्रचंड मानसिक व शारीरिक शोषण सुरू होते. अनेकदा ते हॉटेलमध्ये राहत होते. कार घेऊन बॅण्डस्टॅण्डला जाऊन कारमध्ये झोपत होते. क्रिशन यांनी त्यांचे फ्लॅट विकून तिला तिचा हिस्सा द्यावा, जेणेकरुन ती कायमची लंडनला स्थायिक होईल यासाठी दबाव आणत होती.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा