मुंबई

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी सुरक्षारक्षकाला अटक

कारची चावी देण्यासाठी या तरुणीच्या फ्लॅटमध्ये आला

नवशक्ती Web Desk


मुंबई : जोगेश्‍वरीतील एका निवासी सोसायटीमध्ये राहणाऱ्या तरुणीचा घरात घुसून विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंद होताच सोसायटीचा सुरक्षाक्षक राजीवकुमार रामचंद्र यादव याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याची लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केल्याचे पोलिसांनी सागितले. यातील तक्रारदार तरुणी ही अठरा वर्षांची असून, तिच्या आई वडिलांना गावी सोडण्यासाठी त्यांच्या कारमधून त्यांचा सोसायटीचा सुरक्षारक्षक राजीवकुमार यादव हा गेला होता. रात्री साडेअकरा वाजता तो परत सोसायटीमध्ये आला. त्यानंतर तो कारची चावी देण्यासाठी या तरुणीच्या फ्लॅटमध्ये आला होता. आई-वडिल गावी गेल्याने ती एकटीच होती. ही माहिती राजीवकुमारला माहित होती. त्यामुळे त्याने तिच्या तब्येतीची माहिती विचारून तिच्याशी लगट करून तिचा विनयभंग केला होता. या घटनेने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. घडलेला प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला. त्यांच्या सूचनेनंतर तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी राजीवकुमार यादवविरुद्ध ३५४, ३५४ अ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

Filmfare Awards Marathi 2025 : पहिलाच चित्रपट आणि थेट 'फिल्मफेअर'! अभिनेता धैर्य घोलपला ‘एक नंबर’ चित्रपटासाठी बेस्ट डेब्यू पुरस्कार

Filmfare Awards Marathi 2025 : क्षितीश दाते ठरला बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर; 'या' भूमिकेसाठी मिळाला पहिला फिल्मफेअर!

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार