मुंबई

केतकी चितळेचा गंभीर आरोप,तुरुंगात विनयभंग मारहाण...

४१ दिवसांच्या तुरुंगवासादरम्यान राष्ट्रवादीच्या महिलांनी मला मारहाण केली.

प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी १५ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर २२ जून रोजी तिची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र, या कालावधीत तुरुंगात आपला विनयभंग झाल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप केतकीने केला आहे.

“मला कोणत्याही वॉरंट आणि नोटीसशिवाय घरातून बेकायदेशीरपणे उचलण्यात आले. मी काहीही चुकीचे केले नाही, हे मला ज्ञात होते. सत्य माझ्या बाजुने असल्याने मी त्याचा सामना करू शकले. आपल्या ४१ दिवसांच्या तुरुंगवासादरम्यान राष्ट्रवादीच्या महिलांनी मला मारहाण केली. माझ्यावर विषारी काळी शाई फेकण्यात आली, जी माझ्या त्वचेसाठी हानिकारक होती. माझ्यावर रंग आणि अंडीही फेकण्यात आली. तुरुंगात माझा विनयभंग झाला, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. माझ्या छातीवरही कुणीतही मारले.” “माझ्या पोस्टमध्ये फक्त ‘पवार’ असा उल्लेख केला होता. माझा हेतू कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता. सध्या मी जामीनावर बाहेर असू लढा सुरूच राहणार आहे. माझ्यावर २२ गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी फक्त एकाला जामीन मिळाला आहे. तुरुंगात घालवलेले ४१ दिवस परत येणार नाहीत. मला व्यावसायिक जीवनात अनेक तोट्यांचा सामना करावा लागला. मला भविष्यात काम मिळेल की नाही हे माहित नाही. , कारण माझ्यावर गुन्हेगारीचा शिक्का लागला आहे,” असेही केतकीने सांगितले.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली