मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार  संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

Swapnil S

मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर सात उपाध्यक्ष आणि पंधरा कार्यकारिणी सदस्यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी जाहीर केले.

संस्थेच्या सर्वसाधारण सभेची निवडणूक १५ मार्च रोजी झाली होती. त्यात जिंकलेले ४० सदस्य अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कार्यकारिणी सदस्यांची निवड करतात. शरद पवार यांचाच एकमेव अर्ज आला होता. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदाच्या सात जागांसाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, नामवंत वास्तुविशारद शशी प्रभू, डॉक्टर प्रदीप कर्णिक, माजी आमदार विद्या चव्हाण, पत्रकार व जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, गणराज सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश पवार व विनायक परब यांचे अर्ज आले होते.

उमा नाबर यांची कार्याध्यक्षपदी, मारुती नांदविस्कर कार्योपाध्यक्ष, रवींद्र गावडे प्रमुख कार्यवाह, जयवंत गोलतकर व सतीश राणे यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग