मुंबई

स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये दिवसअखेरीस पुन्हा उसळी

डीजीसीएने बुधवारी स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

वृत्तसंस्था

बुधवारी शेअर बाजार उघडल्यानंतर स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांपर्यंत घसरण होऊन ५२ अाठवड्याचा नीचांक गाठल्यानंतर दिवसअखेरीस पुन्हा तब्बल दोन टक्के उसळी घेतली. कंपनीच्या शेअर्समधील ही कमकुवतता कंपनीच्या विमानसेवा सेवांमध्ये यापूर्वी अनेक अडचणींनंतर दिसून आली आहे. यानंतर, बुधवारी कंपनीचे शेअर्स बीएसईवर जवळपास ७ टक्क्यांनी घसरुन ३५ रुपयांवर जात ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. दिवसअखेरीस तो २.१२ टक्के उसळून ३८.४५ वर बंद झाला. दिवसभरात तो ६.२४ टक्के वधारुन ४० रुपये झाला होता.

दरम्यान, डीजीसीएने बुधवारी स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गेल्या १८ दिवसांत कंपनीच्या विमानात आठ वेळा तांत्रिक दोष आढळून आल्याच्या अहवालानंतर डीजीसीएने ही कारवाई केली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, या घटनांचा आढावा घेतल्यास बहुतांश घटना खराब अंतर्गत सुरक्षा निरीक्षण आणि अपुरी देखभाल यामुळे घडल्या आहेत. या घटना प्रणाली-संबंधित अपयशाची उदाहरणे आहेत आणि सुरक्षा मानकांमध्ये बिघाड झाल्यामुळे घडल्या आहेत. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.

KDMC मध्ये सत्तासमीकरणांना मोठी कलाटणी; मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, भाजपवर कुरघोडी!

'अख्खं मुंब्रा हिरवं करायचंय' वादग्रस्त विधानावर एमआयएम नगरसेविका सहर शेखचं स्पष्टीकरण, म्हणाल्या - "माझ्या पक्षाचा...

अश्लील व्हिडिओ प्रकरणी कर्नाटकच्या डीजीपींचे निलंबन; "कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही" - मुख्यमंत्री सिद्धरामय्या

'स्वत:चं मत कुठे गेलं?' ची पोस्ट व्हायरल; जळगावातील महिला उमेदवाराला खरंच शून्य मतं? जाणून घ्या सत्य

Mumbai : मुदतीआधीच बेलासिस उड्डाणपुलाचे काम फत्ते! मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि ताडदेवमधील वाहतूककोंडी फुटणार