मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: अभिवादनासाठी शिवतीर्थावर शिवसैनीकांची गर्दी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे

नवशक्ती Web Desk

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत शिवाजी पार्क इथं येत आहेत. तसंच महाविकास आघाडीचे नेतेही स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवाजी पार्कमध्ये फुलांची सजावट करून तिथं बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झाले होते. दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होत आहेत.

मुंबईतील शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला आहे. स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याने या परिसरात मोठा प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिवसेच्या (ठाकरे गट ) कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अश्या घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढावे अशी मागणी केली...तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थावरुन बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र शिवतीर्थावरुन बाहेर पडताच दोन्ही गटात पुन्हा जोरदार राडा पाहायला मिळाला.

यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला आधी सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे. तर ,शिंदे गटाने जे काही आरोप केले आहेत त्यांना ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी आधी सुरुवात केली,आणि कोणी आक्षेपार्ह वर्तन केलं आहे. हे सगळे कॅमेऱ्यात कैद झाल आहे असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी म्हटले आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या स्थानाचे पावित्र्य भंग अजिबात करायचे नाही, असं ही त्यांनी म्हटलं आहे.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबई फिरायचीये? मग 'या' चर्चना भेट द्यायला विसरू नका

सोनिया गांधी, राहुल गांधींना मोठा दिलासा! नॅशनल हेराल्ड केसमध्ये कोर्टाने ED ची तक्रार फेटाळली; "FIR नसेल तर मनी लॉन्ड्रींग...

NEET ची खोटी गुणपत्रिका बनवून जे. जे. हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य; २१ वर्षीय तरुणाला अटक