मुंबई

विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेने केला दावा;अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस

सत्ताबदलाच्या आधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपच्या प्रवीण दरेकर यांच्याकडे होते

प्रतिनिधी

राज्‍यातील सत्तासंघर्षामुळे अनेक गणिते बदलली आहेत. आता विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा पुढे आला असून, शिवसेनेने या पदावर आपला दावा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पदासाठी अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस विधानपरिषदेच्या सभापतींकडे केली आहे. याबाबतचे पत्र शिवसेना खा. अरविंद सावंत यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिले.

सत्ताबदलाच्या आधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपच्या प्रवीण दरेकर यांच्याकडे होते; मात्र आता सत्ताबदल झाल्‍याने त्‍यांनी हे पद सोडले. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी संख्याबळानुसार राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांची निवड झाली. विधानपरिषदेत शिवसेनेचे १२, काँग्रेसचे १० आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे १० असे संख्याबळ आहे. अद्याप तरी महाविकास आघाडी अस्‍तित्‍वात आहे. त्‍यामुळे शिवसेनेने या पदावर आपला दावा केला आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या विधानपरिषद सदस्‍यांची ९ जुलै रोजी बैठक झाली होती. या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर कोणाची नियुक्‍ती करायची हे ठरविण्याचे अधिकार पक्षप्रमुख म्‍हणून उद्धव ठाकरे यांना देण्यात आले होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक