मुंबई

शिवसेना आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिलेली नाही; श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल : BMC निवडणुकीत महायुतीच विजयी होईल!

शिवसेना ही आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिलेली नसल्याचे ठणकावतानाच आगामी पालिका निवडणुकांत महायुतीच विजयी होईल, असा विश्वास शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Swapnil S

एस. बालकृष्णन / आफ्रिदा रहमान अली

मुंबई : शिवसेना ही आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिलेली नसल्याचे ठणकावतानाच आगामी पालिका निवडणुकांत महायुतीच विजयी होईल, असा विश्वास शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

दैनिक ‘नवशक्ति’ - ‘द फ्री प्रेस जर्नल’च्या लीडर्स लाऊंज या मुलाखत मालिकेच्या पहिल्या भागात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राचा विकास अशा विविध विषयांवर मोकळेपणाने मत मांडले. त्यांच्याशी झालेला हा सवाल-जबाब.

सेनेतील फाटाफुट आणि एकनाथ शिंदे यांची भूमिका

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली हे एक धाडसी पाऊल होते. हे सत्तेसाठी उचललेले पाऊल नव्हते. तसेच त्यांना कधीही मुख्यमंत्री व्हायचे नव्हते.

राहुल गांधी आणि परकीय प्रभाव

राहुल गांधी यांनी जॉर्ज सोरोस यांच्या प्रभावातून बाहेर यावे. पाकिस्तान राहुल गांधींच्या विधानांचा हत्यार म्हणून वापर करत आहे.

शिवसेनेचे भवितव्य

शिवसेना ही आता कोणाचीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिलेली नाही. आमच्याकडे कुठलाही नंबर १ किंवा नंबर २ नाही. प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्यातील गुणवत्तेवर पुढे येऊ शकतो. आम्ही घराणेशाही मानत नाही. राजाचा मुलगाच राजा होईल, असेही आम्ही मानत नाही. काम आणि संघटन बांधणी महत्त्वाची आहे.

पालिका निवडणुका

आगामी पालिका निवडणुकांत महायुती एकत्र लढेल आणि विजय मिळवेल.

डॉक्टर ते राजकारण

अस्थीरोग तज्ज्ञ असलो तरी मला मुळात राजकारणात यायचे नव्हते. परंतु पक्षाला तरुण, शिकलेला चेहरा हवा होता. डॉक्टरकी आणि राजकारण हे दोन्ही पूर्ण वेळ देण्याचे काम आहे. मी मोठ्या प्रमाणावर लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणाची वाट निवडली आहे.

आंतरराष्ट्रीय संबंध

दहशतवाद ही फक्त भारताची समस्या नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागतिक दौऱ्यांत पाकिस्तानच्या प्रॉक्सी वॉर धोरणाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्दाफाश झालाय. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनिर यांच्या व्हाईट हाऊस भेटीबद्दल विचारल्यावर, डॉ. शिंदे म्हणाले की, राष्ट्र स्वतःच्या हितासाठीचे निर्णय घेते... पण जगाने ९/११ चा हल्ला विसरू नये आणि ओसामा बिन लादेन कुठे सापडला हे लक्षात ठेवावे.

दिशा सालियन प्रकरण :

दिशा सालियन प्रकरण संवेदनशील असून न्यायप्रक्रियेत आहे. याबाबतीत सत्य हळूहळू समोर येईल. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.

राज्याची अर्थव्यवस्था

राज्याचे कर्ज वाढत असतानाही, महाराष्ट्राचे १ लाख कोटींचे अर्थव्यवस्था व्हिजन अबाधित आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री