मुंबई

चार महिलांसह सहा बांगलादेशी नागरिकांना अटक

नवशक्ती Web Desk

मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या चार महिलांसह सहा बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली होती. दहिसर युनिटच्या गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विलास भोसले व त्यांच्या पथकाने गुरुवारी दहिसर येथे वास्तव्यास असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्या दोघीही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. रेहाना खातून मोहम्मद अली मंडल आणि झुलेखा खातून मोहम्मद तैसुल इस्लाम ऊर्फ बिठीता झुल मंडल अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघींना पुढील चौकशीसाठी दहिसर पोलिसांकडे सोपविण्यात आले.

दुसऱ्या घटनेत डी. बी मार्ग पोलिसांनी मुक्तीबेगम मोहम्मद अंबर अली आणि सेलिना बाबा यासीन सरदार या दोन बांगलादेशी महिलांना अटक केली. त्या दोघीही ग्रँटरोडच्या खोदादास इमारतीमध्ये घरकाम करत होत्या. तपासात या दोघीही एक महिन्यांपूर्वीच बांगलादेशातून भारतात आल्या होत्या. अन्य दोन कारवाईत कस्तुरबा मार्ग आणि कांदिवली पोलिसांनी राजू वाहिद शेख आणि अलामीन हमीद शेख या दोघांना अटक केली. ते दोघेही बांगलादेशी नागरिक असून तेथील उपासमारी आणि बेरोजगारीला कंटाळून ते दोघेही बांगलादेशातून मुंबईत पळून आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार