मुंबई

आरे कॉलनीत पशुपक्ष्यांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा; रोगाचे वेळीच निदान व उपचार होणार

दुर्गम भाग असल्याने ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांतील पशुपक्ष्यांच्या रोगाचे निदान वेळीच करणे शक्य होत नाही.

Swapnil S

मुंबई : दुर्गम भाग असल्याने ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांतील पशुपक्ष्यांच्या रोगाचे निदान वेळीच करणे शक्य होत नाही. ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांतील पशूंची संख्या लक्षात घेता गोरेगाव आरे कॉलनीत अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे. राज्य सरकारने गोरेगाव आरे कॉलनीत प्रयोगशाळेला मंजुरी दिली आहे.

कृषी व सहकार विभागाचा शासन निर्णय १० ऑक्टोबर १९७४ अन्वये चिपळूण येथे विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा मंजूर करण्यात आली आहे. १ एप्रिल १९७७ पासून ही प्रयोगशाळा प्रत्यक्षात सेवेत आली आहे. या प्रयोगशाळेच्या कार्यक्षेत्रांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील ६ जिल्ह्यांचा समावेश आहे, मात्र ६ जिल्ह्यांच्या पशुधनाच्या संख्येचे अवलोकन केले असता, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत एकूण ८९,९४,८१९ कुक्कुट पक्षी व ८,३८,५४० पशुधन घटक संख्या आहे. पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यांतील काही भाग दुर्गम असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथून रोग निदानाचे कामकाज करणे कठीण होत आहे. त्यामुळे या भागातील पशुधनास रोग निदानाच्या सेवा पुरविणे सुकर व्हावे यासाठी या प्रयोगशाळेचे स्थलांतरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. अखेर रत्नागिरी या संस्थेचे मंजूर पदांसह स्थलांतरण उपायुक्त पशुसंवर्धन, गुण नियंत्रण प्रयोगशाळा, आरे कॉलनी, गोरेगाव या संस्थेच्या इमारतीमध्ये करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. याबाबत नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग