मुंबई

वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप; १० दिवसांनंतर दंत महाविद्यालयातील वीज सुरळीत

मुंबई सेंट्रल येथील नव्याने सुरू झालेल्या नायर दंत महाविद्यालयात ६ एप्रिल रोजी शॉर्टसर्किटमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.

Swapnil S

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील नव्याने सुरू झालेल्या नायर दंत महाविद्यालयात ६ एप्रिल रोजी शॉर्टसर्किटमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. ६ ते १५ एप्रिलपर्यंत या रुग्णालयाच्या आठव्या, नवव्या आणि १०व्या मजल्यावर असणाऱ्या वसतिगृहाची वीज नसल्याने विद्यार्थ्यांना कामात अडथळा निर्माण होत होता. अखेर सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १५ मार्च रोजी उद्घाटन झाले होते. त्यानंतर काही दिवसांनंतर म्हणजेच ६ एप्रिल रोजी दंत महाविद्यालयाच्या १० मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर ८, ९ व १० व्या मजल्यावरील वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजपुरवठा बंद असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येवर तोडगा निघावा म्हणून सोमवारी विद्यार्थी आणि पदव्युत्तर डॉक्टरांनी काम न करण्याचा निर्णय घेत दिवसभर रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये बसून आपला आक्रोश व्यक्त केला. एकूण २६० विद्यार्थी एका वेळेस राहू शकतील एवढी या वसतिगृहाची क्षमता आहे. मात्र, वीज नसल्याने सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय खुल्या मेसमध्ये केली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले