मुंबई

न्यायालयाने केतकी चितळे हिला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली

प्रतिनिधी

शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या केतकी चितळे हिला ठाणे न्यायालयात बुधवारी हजर केले. न्यायालयाने चितळे हिला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात केतकीच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याने केतकी चितळेचा ताबा घेण्यासाठी ठाणे न्यायालयात पोलीस दाखल झाले. न्यायालयाने त्यांना ताबा दिला. दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे केतकीचे महाराष्ट्र भ्रमण सुरू झाले? असेच चित्र दिसत आहे.

ठाणे गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केतकी चितळेंचे दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप हस्तगत केला. सदर मुद्देमाल हा तपासणीसाठी सायबर सेलकडे देण्यात आला आहे. तर मंगळवारी गुन्हे शाखेच्या कार्यालयात केतकीची आठ तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली. तर सायबर सेलच्या डिव्हाइस तपासणीत काहीच आढळले नाही. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल हा आता फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत