मुंबई

राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाचा तूर्तास दिलासा

प्रतिनिधी

राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याची तक्रार दाखल केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा तूर्तास कायम ठेवला. न्यायमूती प्रकाश नाईक यांनी राहुल गांधीना कठोर कारवाईपासून दिलेले संरक्षण २८ जुलैपर्यंत कायम ठेवत सुनावणी तहकूब केली.

राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करताना राहूल गांधी यांनी कमांडर इन थीफ, चौकिदार चोर हैं, आदी टीका केली होती. या वक्तव्यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टी व अन्य सदस्यांचीही प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे गांधी विरोधात भाजपचे सदस्य महेश श्रीमल यांनी दंडाधिकारी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा केला आहे.

याची दखल घेत गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्याने आणि राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या विधानांचा तक्रारीत समावेश करण्यात आल्याने त्यांच्या नावे समन्स जारी करून हजर राहण्याचे निर्देश दिले होते. ही तक्रार रद्द करावी अशी विनंती करणारी याचिका राहुल गांधी यांच्यावतीने उच्च न्यायालयात केली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली.

साताऱ्यात शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा वेटिंगवर

म्हस्केंच्या उमेदवारीमुळे महायुतीत सुंदोपसुंदी; नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवकांचे राजीनामे

माजी आमदार उपरकर 'उबाठा' पक्षात प्रवेश करणार? आज उद्धव ठाकरे कणकवलीत आल्यानंतर भेट घेणार

राहुल गांधी रायबरेलीतून, अमेठीतून के. एल. शर्मा यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर

तीन RTO अधिकाऱ्यांना अटक, चोरीच्या वाहनांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा नवी मुंबई क्राईम ब्रांचकडून पर्दाफाश