मुंबई

पावसाच्या परतण्याने साथीच्या आजारांचा धोका टळला

प्रतिनिधी

कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आल्यानंतर आता पावसाळ्यात उद‌्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यात पालिकेला यश आले आहे. पाऊस परतला असून पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत घट झाली असून, गेल्या आठवडाभरात मलेरियाचे रुग्ण निम्म्याने घटले आहेत. डेंग्यू, स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोही नियंत्रणात आल्याने मुंबईसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत २७ सप्टेंबरपर्यंत आठवडाभरात मलेरियाचे १७२, डेंग्यूचे ४१ आणि गॅस्ट्रोचे तब्बल ८८ रुग्ण आढळले आहेत; मात्र गेल्या आठवड्यात मलेरियाचे ८९, डेंग्यूचे ३५, गॅस्ट्रोचे १३ रुग्ण आढळले आहेत. तर चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, पावसाळी आजारांमुळे ऑगस्टपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लेप्टो-मलेरियामुळे प्रत्येकी एक आणि डेंग्यू-स्वाईन फ्लूमुळे प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाळी आजार आटोक्यात आले, तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, रस्त्यावर विकले जाणारे उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

IPL 2024: चेन्नईची प्ले-ऑफसाठी झुंज,बेभरवशी पंजाब किंग्जविरुद्ध आज लढत!