मुंबई

इमारत दुर्घटना घडण्याची मालिका सुरुच,महिन्याभरात ५३ घटना घडल्या

प्रतिनिधी

मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली नसताना विविध दुर्घटना घडण्याची मालिका सुरु झाली आहे. १ ते ३० जून दरम्यान इमारत व इमारतींचा भाग कोसळण्याच्या तब्बल ५३ घटना घडल्या आहेत.

जून महिन्यात विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये २३ जण दगावले असून ४७ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पावसाची दमदार हजेरी लागण्यापूर्वी पडझडीच्या घटना घडू लागल्या आहेत. चेंबूर येथे २३ जून रोजी भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना कुर्ला पूर्व नाईक नगर सोसायटीतील इमारत कोसळली आणि १९ जणांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईत १ ते ३० जून दरम्यान इमारतीचा भाग कोसळण्याच्या ५३ घटना घडल्या असून २३ जणांचा मृत्यू झाला तर ४७ जण जखमी झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने दिली. जून महिन्यात वीजेचा शॉक लागल्याच्या ११ घटना घडल्या.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण