मुंबई

डॉक्टर महिलेच्या नोकराकडून पावणेनऊ लाखांची चोरी

Swapnil S

मुंबई : मालाड येथे राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेच्या घरी तिच्याच घरी काम करणाऱ्या महिला नोकराने सुमारे पावणेनऊ लाखांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नोकर महिलेविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. दिप्ती हरेश गोयमावाला ही ५४ वर्षांची महिला डॉक्टर असून ती तिच्या कुटुंबियांसोबत मालाड येथील सुभाष लेन, मोनिका आर्केड अपार्टमेंटमध्ये राहते. तिने घरातील विविध कामासाठी पाच महिलांना नोकरीवर ठेवले होते. दिवसभर काम करून या पाचही महिला त्यांच्या घरी निघून जातात. सोमवारी ५ फेब्रुवारीला रात्री उशिरा घरी आल्यावर तिला कपाटातील लॉकर उघडे असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने लॉकरमधील दागिन्यांची पाहणी केली होती. त्यात तिला विविध सोन्याचे दागिने, ५० हजाराची कॅश असा सुमारे पावणेनऊ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. तिने दिडोंशी पोलिसांना घरात झालेल्या चोरी माहिती देऊन तक्रार केली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त