मुंबई

‘ब्रिमस्टोवॅड’च्या नियोजनाचे तीनतेरा

रुपये खर्च करूनही अद्याप मुंबईतील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही

नवशक्ती Web Desk

मुंबईतील पावसाळी पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी व पुरावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने १९९३ पासून राबवलेल्या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचा चार दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे बोजवारा उडतो. महापालिकेने या प्रकल्पावर आतापर्यंत दोन हजार ५४१ कोटी रुपये खर्च करूनही अद्याप मुंबईतील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.

ब्रिमस्टोवॅट प्रकल्पाची सद्यस्थिती

क्षमता : ताशी ५० मिलिमीटर पावसाचे पाणी वाहून नेण्याची

प्रकल्पाचा खर्च : ३,०१४.५१ कोटी रुपये

आतापर्यंत झालेला खर्च : २,५४१.३७ कोटी

दोन टप्प्यांमध्ये एकूण ५८ कामे

पहिला टप्पा

शहर - ५, पश्चिम उपनगर - ७ व पूर्व उपनगर - ८

पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेली कामे

शहर - ५, पश्चिम उपनगर - ६ व पूर्व उपनगर - ७

दुसरा टप्पा

शहर - १६, पश्चिम उपनगर - १० व पूर्व उपनगर - १२

दुसऱ्या टप्प्यातील पूर्ण झालेली कामे

शहर - १४, पश्चिम उपनगर - ४, पूर्व उपनगर - ७

या ठिकाणी पम्पिंग स्टेशन

महालक्ष्मी, रे रोड ब्रिटानिया, वरळी लव ग्रो, वरळी क्लिव्हलॅन्ड, सांताक्रूझ गझदरबंद, ईर्ला जूहू असे सहा पम्पिंग स्टेशन सुरू झाले आहेत. तर, ओशिवरा येथील मोगरा पम्पिंग स्टेशनचे काम सुरू आहे. माहूल पम्पिंग स्टेशन प्रक्रिया सुरू असून त्याचा फायदा किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, कुर्ला नेहरू नगर, चेंबूर सिंधी सोसायटी या भागांना दिलासा मिळणार आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश