मुंबई

मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी; सुरक्षेत केली वाढ

अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळ तसेच एका विमानात स्फोट घडवून आणणार असल्याची धमकी दिली होती

प्रतिनिधी

मुंबई विमानतळ उडवून देण्याच्या ईमेलवरून तपास यंत्रणेमध्ये एकच खळबळ उडाली होती; मात्र संपूर्ण विमानतळाची तपासणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सायबर सेल अधिकाऱ्यांच्या मदतीने संमातर तपास करीत आहेत.

शनिवारी रात्री मुंबई विमानतळ प्राधिकरणाला एक मेल आला होता. या मेलमध्ये अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळ तसेच एका विमानात स्फोट घडवून आणणार असल्याची धमकी दिली होती. या धमकीच्या मेलनंतर विमानतळ प्राधिकरणाने संपूर्ण विमानासह विमानतळाची तपासणी सुरू केली होती. बॉम्बशोधक पथकाने श्‍वान पथकाच्या मदतीने केलेल्या तपासणीत तिथे कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे धमकीचा हा मेल बोगस असल्याचे उघडकीस आले.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्रातील प्रलंबित निवडणुका आधी होणे आवश्यक; सुप्रीम कोर्टाचा विशेष अनुमती याचिकेत हस्तक्षेपाला नकार