मुंबई

देवरांच्या मागे काँग्रेसचे आणखी तीन माजी नगरसेवक शिवसेनेत

Swapnil S

मुंबई : खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दक्षिण मुंबईतील तीन माजी नगरसेवकही शिवसेनेत दाखल झाले आहेत. माजी नगरसेविका सुषमा विनोद शेखर, नगरसेविका शहाना रिझवान खान व नगरसेविका राबिया शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षात प्रवेश केला. आतापर्यंत काँग्रेसमधील सहा नगरसेवकांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे.

निवडणुका तोंडावर आल्याने सर्वच पक्षांनी रणनीती मांडण्यास सुरुवात केली असताना पक्षप्रवेशही सुरू झाले आहेत. बुधवारी दक्षिण मुंबईतील मिलिंद देवरा समर्थक तीन माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी त्यांचे स्वागत केले. जे नगरसेवक शिवसेनेत आले, कारण त्यांना त्यांच्या विभागात चांगले काम करायचे आहे. त्यांना ती संधी आजतागायत मिळाली नव्हती. जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आहे, तो विश्वास सार्थ ठरेल अशी मी खात्री देतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना सांगितले. आपले सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. जनतेला आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळेच रोज नवनवीन पक्षप्रवेश होत आहेत. आपल्या सरकारने जे लोककल्याणकारी काम मागील दीड वर्षांत केले, ही त्याचीच पोचपावती आहे, असेही शिंदे म्हणाले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस