मुंबई

तृतीयपंथीवर लैंगिक अत्याचार; आरोपी मित्राला अटक

पिडीत तृतीयपंथी हा कांदिवलीतील गणेशनगर परिसरात राहतो. १० वर्षांपूर्वी गरब्याच्या वेळेस त्याची गोरेगाव येथे राहणाऱ्या ओंकारशी ओळख झाली होती.

Swapnil S

मुंबई : कांदिवलीतील एका तृतीयपंथीवर अनैसगिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ओंकार जितेंद्र इंगले या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

पिडीत तृतीयपंथी हा कांदिवलीतील गणेशनगर परिसरात राहतो. १० वर्षांपूर्वी गरब्याच्या वेळेस त्याची गोरेगाव येथे राहणाऱ्या ओंकारशी ओळख झाली होती. मैत्रीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. त्याने पिडीत तृतीयपंथीवर अनेकदा जबदस्तीने अनैसगिक लैंगिक अत्याचार केले होते. त्याच्याकडून वेळोवेळो पैशांची मागणी करून पैसे घेतले होते. काही महिन्यांपूर्वी ओंकारने लग्न केले होते. ही माहिती पिडीत तृतीयपंथीला समजताच त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर त्याने त्याला मारहाण केली होती. त्यामुळे त्याने ओंकारविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध अनैसगिक लैंगिक अत्याचारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी मित्राला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Maharashtra Rain Alert : राज्यभरात पाऊस वाढण्याची धास्ती; कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी पावसाची शक्यता

जामीन अर्जांच्या सुनावणीत चालढकल खपवून घेणार नाही; कोर्टाला सहकार्य करण्याचे निर्देश; उच्च न्यायालयाची कठोर भूमिका

मराठा समाजबांधवांना तात्पुरता दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी घटल्या; माहिती अधिकारातून आकडे समोर

'पीओके'तील जनता म्हणेल, आम्ही भारतवासी; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास