मुंबई

आदिवासी महिलांना आरे आंदोलनात पोलिसांनी जाण्यासाठी रोखले,लहान मुलांवर पोलिस ओरडले

प्रतिनिधी

मुंबईकरांचे फुप्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि जैवविविधतेने नटलेल्या आरेत कारशेड उभारण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. त्यामुळे या विरोधात सेव्ह आरेकडून आंदोलन छेडण्यात आले आहे. यात २५०हून अधिक नागरिक सहभागी झाले; मात्र या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपल्या लहान मुलांसोबत आलेल्या आदिवासी महिलांना पोलिसांनी आरे आंदोलनात जाण्यासाठी रोखले. त्यांच्या या ओरडण्याला घाबरून लहान मुलांचा आक्रोश सुरू केला. लहान मुले असतानातरी पोलिसांनी सामंजस्य दाखविण्याची गरज असल्याचे सेव्ह आरे ग्रुपकडून सांगण्यात आले.

सेव्ह आरे सेव्ह मुंबई, सबको साथ आना होगा, सबको बचाना होगा, फडणवीस सरकार जागे व्हा, आरे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची, आरे वाचवा लवकरच कारशेडचा निर्णय घ्या, अशा घोषणा देत सेव्ह आरेकडून कारशेडविरोधात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यादेखील आरे जंगल वाचवा मोहिमेसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. विद्या चव्हाण यांनी प्रकल्पाला विरोध करत प्रकल्प लवकरात लवकर आरेच्या बाहेर स्थलांतर करण्याची मागणी यावेळी केली. तसेच पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यामुळे विद्या चव्हाण यांनी पोलिसांना प्रश्न उपस्थित केले.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम