उद्धव ठाकरे संग्रहित छायाचित्र
मुंबई

ज्यांनी पक्ष फोडला, पक्ष चोरला तेच मत मागताहेत, ठाकरेंची फडणवीसांवर टीका; उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी मातोश्रीवर

जगदीश धनखड यांनी आजारपणाचे कारण देत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते गायब झाले. त्यात एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली असून मतासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. ज्यांनी पक्ष फोडला, पक्ष चोरला तेच मतांसाठी फोन करताहेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

Swapnil S

मुंबई : जगदीश धनखड यांनी आजारपणाचे कारण देत उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते गायब झाले. त्यात एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली असून मतासाठी देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता. ज्यांनी पक्ष फोडला, पक्ष चोरला तेच मतांसाठी फोन करताहेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

देशाची लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील आहे. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शुक्रवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. आधीचे उपराष्ट्रपती राजीनामा देऊन अचानक गायब झाले. त्यानंतर ही निवडणूक होत आहे. इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने आम्ही ही निवडणूक लढत आहोत. इंडिया आघाडीकडून रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केले. आता देशाला संविधानाची शपथ घेऊन न्यायबुद्धीने वागणारे उपराष्ट्रपती पाहिजेत.

या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत, त्याला अधिक मजबुती येण्यासाठी आपण ही निवडणूक जिंकण्याच्या विश्वासाने लढवत आहोत. मी सुदर्शन यांना धन्यवाद देतो, ते मुंबईत आले, मातोश्रीला आले. आमच्याकडून त्यांना पाठिंबा आहे, असे ठाकरे म्हणाले.

संख्याबळावर निवडणूक अवलंबून असती, तर निवडणूक घेण्यात अर्थ नाही. मतदानात गोपनीयता आहे. त्यामुळे ज्यांच्या हृदयात देशप्रेम आहे, असे एनडीएचे खासदार देशासाठी मतदान करू शकतात, असेही ते म्हणाले.

... म्हणून त्याला चमत्कार म्हणतात

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष, त्यांचे नेते एकदिलाने सोबत आहोत. चमत्कार चौकटीत होत नसतो, तो कसाही होऊ शकतो, म्हणून त्याला चमत्कार म्हणतात. देश विचित्र परिस्थतीत नेला जातोय. त्या परिस्थितीत जाण्यापूर्वी आपण त्याला थोपवू शकतो, तरच आपली लोकशाही वाचेल. १५० वर्षांच्या गुलामगिरीतून आपण मुक्त झालो, त्या गुलामगिरीत पुन्हा देश जाणार नाही.

बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला

मातोश्री निवासस्थानी याआधी बाळासाहेब ठाकरे असताना आलो आहे. मातोश्री निवासस्थानात महाराष्ट्राच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भेट घेत बाळासाहेब यांचे आशीर्वाद घेतले, असे रेड्डी म्हणाले.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती