@OfficeofUT
@OfficeofUT
मुंबई

"धनुष्यबाण चोरला असला तरी..." काय म्हणाले उद्धव ठाकरे?

प्रतिनिधी

आज रामनवमीनिमित्त देशभरात उत्साह आहे. अशामध्ये काही शिवसैनिकांनी थेट रामटेकहून मुंबईपर्यंत पायी चालत प्रवास केला. यावेळी मुंबईत आल्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे कौतुक करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच, यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीका केली. ते म्हणाले, "धनुष्यबाण जरी चोरला असला तरी माझे प्रभू श्रीराम माझ्यासोबत आहेत." असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, "तुम्ही सगळे माझी ताकद आहेत. धनुष्यबाण जरी कागदावरचा घेऊन गेले असले, तरी हे बाण माझ्या भात्यामध्ये आहेत. हे फक्त बाण नाहीत, तर हे ब्रह्मास्त्र आहेत." असे म्हणत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते पुढे म्हणाले की, "धनुष्यबाण चोरला असला तरी प्रभू श्रीराम हे माझ्यासोबत आहेत. माझ्या संविधानाचे, लोकशाहीचे रक्षण मीच करणार. सागरी सेतू निर्माण करतेवेळी वानरसेनेसोबतच खारुताईनेही मदत केली होती. आपण सगळे एकत्र आलो, तर लंकादहन करू शकणार नाही का?" असा सवालही त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, "रामसेतू बनवताना प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन दगड टाकला, तरी तो तरंगायचा. सध्याच्या राजकारणातही प्रभू श्रीरामांचे नाव घेऊन दगड तरंगत आहेत. तेव्हा दगडांवर पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते तरंगत होते. आता दगडच राज्य करत आहेत. मग खऱ्या रामभक्तांनी करायचे काय? ते रामभक्तांचे काम मला तुमच्याकडून अपेक्षित आहे," असे म्हणत त्यांनी शिंदे - फडणवीस सरकारला टोला लगावला.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण