मुंबई

मुंबईत लवकरच ३० ठिकाणी अद्ययावत शौचालय उभारण्यात येणार

प्रतिनिधी

वाढत्या लोकसंख्येनुसार आता शौचालयांच्या संख्यावाढीवर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने भर दिला आहे. विशेष म्हणजे, शौचालयांच्या संख्येत वाढ करण्याबरोबर शौचालयात अंघोळ, कपडे धुण्यासाठी जागा, उपकरणे चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. मुंबई शहर व उपनगरात ३० ठिकाणी अद्ययावत शौचालय उभारण्यात येणार आहेत. शौचालयांची कमतरता भासू नये, यासाठी अद्ययावत शौचालय उभारण्याचा निर्णय घेतल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी सांगितले.

मुंबई शहर व दोन्ही उपनगरांत तीन हजारांच्या घरात शौचालय आहेत. मुंबईची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात पोहोचली असून, मुंबई दर्शनासाठी रोज हजारो पर्यटक मुंबईत येत असतात. मुंबईत खास करून महिलांची अपुऱ्या शौचालयांमुळे गैरसोय होते. त्यामुळे नवीन शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला असून एकूण ३० ठिकाणी फाईव्ह स्टार ते सेव्हन स्टार अशा अद्ययावत स्वरूपाची शौचालये उभारण्यात येणार आहेत. शौचालयात अंघोळीच्या सुविधेसोबतच कपडे धुण्यासाठीची, तसेच उपकरणे चार्जिंगची सुविधा असणार आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणासाठी या ठिकाणी कॅफेसारखे मॉडेलही विकसित करण्याचा पालिकेचे नियोजन असून, यामुळे मुंबई महापालिकेला महसूल प्राप्त होईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा