मुंबई

अदानी समूह वाढवण बंदर उभारणीसाठी उत्सुक; L&T, रेल विकाससह १५ कंपन्यांबरोबर स्पर्धा

बहुचर्चित वाढवण बंदराच्या उभारणीचे कंत्राट मिळवण्यासाठी आघाडीचा उद्योग समूह अदानीच्या अदाणी पोर्टस् ॲण्ड सेझ या उप कंपनीने स्वारस्य दाखवले असून एल ॲण्ड टी आणि रेल विकास लिमिटेड अशा एकूण १५ कंपन्यांचीही स्पर्धा असेल.

Swapnil S

भालचंद्र चोरघडे/मुंबई

बहुचर्चित वाढवण बंदराच्या उभारणीचे कंत्राट मिळवण्यासाठी आघाडीचा उद्योग समूह अदानीच्या अदाणी पोर्टस् ॲण्ड सेझ या उप कंपनीने स्वारस्य दाखवले असून एल ॲण्ड टी आणि रेल विकास लिमिटेड अशा एकूण १५ कंपन्यांचीही स्पर्धा असेल. या कंपन्यांनी प्रस्तावित वाढवण बंदरासाठी स्वारस्य अर्ज सादर केले आहेत़

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑगस्ट रोजी वाढवण बंदराच्या पायाभरणीचे उद्घाटन करण्यात आले होते़ वाढवण पोर्टच्या वतीने बंदराच्या उभारणीच्या कामाचे कंत्राट देण्यासाठी स्वारस्य अर्ज मागिवण्यात आले होते. हे सीलबंद अर्ज २ सप्टेंबर रोजी उघडण्यात आले.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी याबद्दलची माहिती देताना सांगितले की, आम्हाला एकूण १५ कंपन्यांचे अर्ज मिळालेले आहेत. या सर्व अर्जांची तपासणी केल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. केंद्राकडून प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष टेंडर काढण्यात येतील. या प्रक्रियेला साधारण २ ते ३ महिन्यांचा अवधी लागेल, असेही वाघ यांनी सांगितले.

वाढवण बंदरामुळे महाराष्ट्, गुजरात आणि एनसीआर यांच्यातील दळवणवळण मार्ग सुलभ होणार आहे. मध्य पूर्वेतील राष्ट् आणि युरोपीय देशांमध्ये दळणवळणाला चालना मिळणार आहे. वाढवण बंदराच्या उभारणीला एकूण ७६,२२० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या या बंदरात माल साठवणुकीचे १ हजार मीटर लांबीचे ९ कंटेनर टर्मिनल्स असणार आहेत़

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत