मुंबई

वर्षा गायकवाडांनी विजयश्री खेचून आणली; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना धूळ चारली

Swapnil S

उत्तर मध्य मुंबई: उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार सरकारी वकील ॲॅड. उज्ज्वल निकम यांचा १६ हजार ५१४ मतांनी पराभव केला. वर्षा गायकवाड यांना ४ लाख ४५ हजार ५४५ मते मिळाली, तर उज्ज्वल निकम यांना ४ लाख २९ मते मिळाली.

या विभागात मराठी, मुस्लिम मते प्रभावी ठरली असून मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मराठी आणि मुस्लिम मतदार या मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात मतमोजणीवेळी विजयाचे पारडे कधी वर्षा गायकवाड तर कधी उज्ज्वल निकम यांच्या पारड्यात झुकत होते. अखेर अटीतटीच्या झालेल्या या लढतीत वर्षा गायकवाड यांनी १६ हजारांच्या मताधिक्क्याने बाजी मारली. एका क्षणी उज्जल निकम यांची आघाडी जवळपास ६० हजारांच्या वर गेली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात उज्ज्वल निकम यांना मागे टाकत वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली आणि विजय मिळवला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त