Vasai : संतापजनक! फुटबॉलमध्ये करिअरचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाला अटक 
मुंबई

Vasai : संतापजनक! फुटबॉलमध्ये करिअरचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाला अटक

फुटबॉल खेळात मोठे करिअर करून देण्याचे खोटे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन महिला खेळाडूवर गेल्या ३ वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वसईत खाजगी फुटबॉल प्रशिक्षकाला अटक केली आहे

Mayuri Gawade

फुटबॉल खेळात मोठे करिअर करून देण्याचे खोटे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन खेळाडू मुलीवर गेल्या ३ वर्षांपासून अत्याचार केल्याची संतापजनक घटना वसईमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ३६ वर्षीय खाजगी फुटबॉल प्रशिक्षक (कोच) अभिजित मेंडल याला अटक केली आहे. आरोपीवर बलात्कार, धमकी आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

करिअरच्या बहाण्याने जाळ्यात ओढले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी २०२३ मध्ये आरोपी अभिजित मेंडल याच्या वसई येथील खाजगी फुटबॉल अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाली होती. आरोपीने तिचा विश्वास संपादन केला आणि तिला फुटबॉल क्षेत्रात मोठ्या संधी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पाडून त्याने गेल्या तीन वर्षांत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.

व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग

संतापजनक बाब म्हणजे, अत्याचार करत असताना आरोपीने पीडितेचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो देखील काढून घेतले होते. या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून जेव्हा पीडित मुलीने त्याच्या अकॅडमीपासून आणि त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सतत ब्लॅकमेल करत राहिला.

कुटुंबाच्या धाडसामुळे पोलिसांत तक्रार

आरोपीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला संपूर्ण आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी तात्काळ माणिकपूर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

पोलिस कारवाई आणि तपास

माहितीनुसार, तक्रार मिळताच पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून आरोपी अभिजित मेंडलला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या क्रीडा क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे वसई परिसरात आणि क्रीडा जगतात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आणखी काही मुलींची फसवणूक झाली आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण