Vasai : बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार? फाटक यांच्या उमेदवारीच्या चर्चेत हितेंद्र ठाकूर यांची भूमिका 
मुंबई

Vasai : बहुजन विकास आघाडी शिवसेनेत विलीन होणार? फाटक यांच्या उमेदवारीच्या चर्चेत हितेंद्र ठाकूर यांची भूमिका

वसई-विरारच्या राजकारणात सध्या बहुजन विकास आघाडी (बविआ) शिवसेनेत विलीन होणार का? या चर्चेने मोठी खळबळ उडवली आहे.

Swapnil S

वसई : वसई-विरारच्या राजकारणात सध्या बहुजन विकास आघाडी (बविआ) शिवसेनेत विलीन होणार का? या चर्चेने मोठी खळबळ उडवली आहे. त्यातच रवींद्र फाटक यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांच्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, वसई-विरार महानगरपालिकेतील नगरसेवकांचे गणितही या चर्चेत महत्त्वाचे ठरत आहे. ११५ सदस्यांच्या सभागृहात बहुजन विकास आघाडीचे ७१ नगरसेवक असून स्पष्ट बहुमत बविआकडे आहे, तर भाजपकडे ४३ जागा आहेत. शिवसेनेला एक जागा मिळाल्याने स्थानिक राजकारणातील समीकरणे अधिक चर्चेत आली आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची भूमिका आणि संभाव्य राजकीय युतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

या सर्व चर्चांवर बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी भूमिका स्पष्ट करत पक्षाची दिशा, कार्यकर्त्यांचे मत आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतले जातील, असे संकेत दिल्याने चर्चांना आणखी वेग आला आहे. निवडणुका आल्या की सर्वच पक्ष माझी मदत घ्यायला येतात. शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक हे पण आज काहीतरी घ्यायला आले होते, द्यायला नाही. मला विधान परिषद आमदार होण्यात स्वारस्य नाही. दोन दिवसात निर्णय घेऊ. क्षितिज ठाकूर माझा मुलगा आहे आणि माझे त्याच्यावर प्रेम आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात आमची ताकद असून, शिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचीही आम्हाला साथ आहे असे बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर म्हणाले.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग