मुंबई

विक्रोळीत घरगुती सिलिंडर स्फोटात एकाचा मृत्यू; एक जण गंभीर जखमी; बैठ्या चाळीत स्फोट

Swapnil S

मुंबई : विक्रोळी पूर्व, पार्क साईट येथील श्रीराम सोसायटीतील एका घरात शनिवारी रात्री सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत राधेश्याम पांडे (४६) यांचा मृत्यू झाला आहे. तर धनंजय मिश्रा हे ९९ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

विक्रोळी पूर्व, पार्क साईट, संजय गांधी नगर येथील श्रीराम सोसायटी ही बैठी चाळ आहे. या चाळीतील एका घरात शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे जोरदार आवाज झाला आणि श्रीराम सोसायटीत एकच घबराट पसरली. काय झाले हे कळायच्या आत चाळीतील लोकांनी घराबाहेर धाव घेतली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी बचावकार्य सुरू केले. रात्री १०.१० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या स्फोटात राधेश्याम पांडे आणि धनंजय मिश्रा हे गंभीर भाजले. दोघांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र राधेश्याम पांडे यांचा तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर पांडे हे ९९ टक्के भाजले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून राजावाडी रुग्णालयातून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीत घरातील सामान जळून खाक झाले. आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध अग्निशमन दलाचे अधिकारी व स्थानिक पोलीस घेत आहेत.

चित्रा सिनेमागृहातील कॅन्टीनमध्ये आग

दादर पूर्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर असलेल्या चित्रा सिनेमागृहातील कॅन्टीनमध्ये रविवारी दुपारी ३.१४ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सिनेमागृह रिकामे केले आणि ३ वाजून २४ मिनिटांनी म्हणजेच १० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत