मुंबई

विलेपार्लेचा आयुर्वेदिक दवाखाना रुग्णांच्या सेवेत लवकरच दाखल

काही दिवसांपूर्वी दै. ‘नवशक्ति’ वृत्तपत्राने 'विलेपार्ले येथील आयुर्वेदिक दवाखाना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल मुंबई महापालिका प्रशासनाने घेतली. येत्या दोन आठवड्यांत स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून हा दवाखाना कार्यान्वित होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

Swapnil S

मुंबई : काही दिवसांपूर्वी दै. ‘नवशक्ति’ वृत्तपत्राने 'विलेपार्ले येथील आयुर्वेदिक दवाखाना उद्घाटनाच्या प्रतीक्षेत' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल मुंबई महापालिका प्रशासनाने घेतली. येत्या दोन आठवड्यांत स्थलांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून हा दवाखाना कार्यान्वित होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्षामार्फत विलेपार्ले येथील आयुर्वेदिक दवाखाना इमारत उभारण्यात आली आहे. ही इमारत सार्वजनिक आरोग्य खाते, ‘के पूर्व’ विभाग यांना २६ जून २०२५ रोजी हस्तांतरित करण्यात आली असून लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक