मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करून सज्ज असले पाहिजे. मुंबईतील ५० जागांची निवड करून त्या जागा लढण्याची तयारी करावी, असे आवाहन आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आठवले म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची कामगिरी सिद्ध करण्यासाठी कामाला लागावे. त्यासाठी मुंबई प्रदेश कार्यकारिणीने २५ जणांची रिपब्लिकन वर्किंग कमिटी निवडण्यात यावी. महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला महापालिका निवडणुकीत किमान ३० जागा सोडतील, असा विश्वास आहे. आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.