मुंबई

World Cup 2023 :तब्बल १२ वर्षानंतर भारत आणि श्रीलंका पुन्हा येणार आमनेसामने; कोण मारेल बाजी? याकडं लागून आहे लक्ष...

नवशक्ती Web Desk

मुंबई आणि श्रीलंका परत मैदानांत एकमेकांन समोर येणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर 2011 नंतर परत एकदा भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना पाहायला मिळणार आहे. 2 एप्रिल 2011 रोजी वानखेडे स्टेडिअमवर एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका या दोघांमध्ये खेळवला होता. या सामन्यात टीम इंडियान दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. आता तब्बल 12 वर्षांनंतर हे दोन्ही संघ पुन्हा यांच मैदानावर आमनेसामने येणार आहेत.

भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील साखळी सामना 2 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया मुंबईत दाखल झाली असून त्यांनी सरावाला देखील सुरूवात केली आहे. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघान सहा सामने जिंकले आहेत. पण, भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालेलं नाही. श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकून टीम इंडियाला उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करून गुणतालिकेत पाहिलं स्थान पटकावण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे.

भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये श्रीलंकेपेक्षा अधिक पुढं आहे. आतापर्यंत झालेल्या 167 सामन्यांपैकी भारतीय संघान 98 सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. त्यामुळे याबाबतीत भारतीय संघ अधिक पुढं आहे.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग