Bhayandar : आठव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Bhayandar : आठव्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

काशीगाव पोलीस ठाणे हद्दीतील विनय नगर भागात एका तरुणाने इमारतीच्या ८ व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Swapnil S

भाईंंदर : काशीगाव पोलीस ठाणे हद्दीतील विनय नगर भागात एका तरुणाने इमारतीच्या ८ व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवीण मनिलाल नझीकाथुपरमबील असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी काशीगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत प्रवीण आपली मोटारसायकल साफ करण्यासाठी तेलाची बॉटल घेऊन घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने विनय नगर, काशिगाव येथील बर्सीलोनाथ इमारतीच्या विंग - २ मधील रूम नंबर ८०५ ए च्या ८ व्या मजल्यावरील रेफ्युजी फ्लॅटच्या बाल्कनीमधून खाली उडी मारली.

प्रवीणने खाली उडी मारल्याचे पाहताच सोसायटीमधील लोकांनी तातडीने त्याच्या घरी जाऊन वडील मनिलाल यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रुग्णवाहिकेने भाईंदर (पश्चिम) येथील पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी तपासून रात्री ९:४० च्या सुमारास त्याला मृत घोषित केले.

CJP चे Instagram हँडल अचानक बंद, काही तासांत पुन्हा सुरू; अभिजीत दिपके म्हणाले - 'स्वातंत्र्यदिनी आमचा आवाज...

Mumbai : घराजवळील रुग्णालयासह उपचाराची माहिती एका क्लिकवर; आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट

Video : अवघ्या ५ मिनिटांच्या उशिराची 'अशी' शिक्षा? डिलिव्हरी बॉयचा मोबाईल हिसकावून फ्लॅटमध्ये नेलं अन्...

Mumbai : गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाइन 'एक खिडकी' योजना

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर