राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये १० नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी सुरक्षा दलांचे अभिनंदन केले असून बस्तर परिसरात शांतता आणि प्रगतीचे पर्व सुरू होत असल्याचे म्हटले आहे.

Swapnil S

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी सुरक्षा दलांचे अभिनंदन केले असून बस्तर परिसरात शांतता आणि प्रगतीचे पर्व सुरू होत असल्याचे म्हटले आहे. सुरक्षा दलांचे संयुक्त पथक भेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षलविरोधी कारवाई करीत असताना ही चकमक उडाली, असे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. कोराजगुडा, दंतेस्पूरम, नागरम आणि भांडारपाडार गावांमधील जंगलातील डोंगराळ परिसरात माओवादी असल्याची खबर मिळल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती.

चकमक थांबल्यानंतर घटनास्थळी १० नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे रायफल, एके-४७ रायफल आणि एसएलआरही अशा प्रकारची शस्त्रेही तेथून जप्त करण्यात आली. जिल्हा राखीव दल, केंद्रीय राखीव पोलीस दल अद्यापही तेथे शोध घेत आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?