राष्ट्रीय

उत्तर प्रदेशात काँग्रेसला ११ जागा; सपा नेते अखिलेश यादव यांची घोषणा

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीत मोठ्या घडामोडी घडत आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. कोणत्या उमेदवाराला कुठून उमेदवारी द्यायची याची चर्चा सुरू झाली आहे. आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर ‘उत्तर प्रदेशात काँग्रेसला ११ जागा देण्याची परस्पर घोषणा करून टाकली.’

काँग्रेसला आम्ही ११ जागा देणार आहोत. चांगल्या आघाडीची ही सुरुवात आहे. ‘इंडिया’ची टीम व ‘पीडीए’ची रणनीती इतिहास बदलून टाकेल. उत्तर प्रदेशात सध्या काँग्रेसकडे केवळ एकच लोकसभेची जागा आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी येथून निवडून आलेल्या आहेत. प. बंगालमध्ये काँग्रेस व तृणमूलमध्ये जागा वाटपावरून मतभेद समोर आले, तर पंजाबमध्ये ‘आप’ने लोकसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून