प्रातिनिधिक फोटो
राष्ट्रीय

काश्मीरमध्ये घुसखोरी करणारे २ दहशतवादी ठार

Swapnil S

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रणरेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना गुरुवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केरन क्षेत्रातील नियंत्रण रेषेवरून खोऱ्यात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात दहशतवादी असल्याची खबर सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे सतर्क असलेल्या सुरक्षारक्षकांना दहशतवाद्यांच्या काही हालचाली दिसताच त्यांनी गोळीबार केला. त्यात दोन दहशतवादी ठार झाले असून अद्यापही ही चकमक सुरू आहे.

दोडामध्ये चकमकीत लष्कराचे २ जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात गुरुवारी पहाटे दहशतवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले. हवामान अनुकूल नसतानाही सुरक्षा दलांनी आपली शोधमोहीम आणि कारवाई सुरू ठेवली आहे.

कस्तीगड परिसरातील जद्दन बटा गावात ही चकमक जवळपास एक तास सुरू होती. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या जवानांना उधमपूर येथील रुग्णालयात हेलिकॉप्टरने नेण्यात आले.

दरम्यान, नियंत्रणरेषेवर संशयास्पद हालचाली दिसल्याने लष्कराने गोळीबार केला. गुरुवारी सकाळी या परिसराची पाहणी करण्यात आली, परंतु संशयास्पद हालचालींशी संबंधित काहीही आढळले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसह चार जण शहीद झाल्यानंतर तेथे शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस आणि घनदाट धुक्यामुळे शोधमोहिमेत अडथळे येत आहेत.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन