राष्ट्रीय

विशाखापट्टणममध्ये जेट्टीवर लागलेल्या आगीत ४० मच्छिमारी बोटी बेचिराख

विशाखापट्टणमचे पोलीस उपायुक्त-झोन दोनचे आनंदा रेड्डी यांनी सांगितले की, रविवार आणि सोमवारची मध्यरात्र जोरदार वादळी होती.

नवशक्ती Web Desk

विशाखापट्टण : विशाखापट्टणम कंटेनर टर्मिनलजवळ असलेल्या एका जेट्टीवर उभ्या असणाऱ्या मच्छिमारी बोटींना लागलेल्या आगीमध्ये ४० बोटी बेचिराख झाल्या. सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आगीचे कारण नेमके काय आहे, त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विशाखापट्टणम कंटेनर टर्मिनल आणि इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या सुविधा असणाऱ्या या जेट्टीनजीक या बोटी उभ्या होत्या.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आम्ही अग्निशमन दलाचे १२ बंब आणले आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्टचीही मदत घेतली, असे विशाखापट्टणमचे जिल्हा अग्निशमन अधिकारी एस. रेणुकेय यांनी सांगितले.

आग अन्यत्र कुठे पसरू नये, यासाठी जवानांनी प्रयत्न केले आणि दोन तासांमध्ये आग विझविण्यात यश आल्याचे रेणुकेय यांनी सांगितले.

विशाखापट्टणमचे पोलीस उपायुक्त-झोन दोनचे आनंदा रेड्डी यांनी सांगितले की, रविवार आणि सोमवारची मध्यरात्र जोरदार वादळी होती. ज्यामुळे फायबरच्या आणि जवळून नांगरलेल्या बोटींमध्ये आग वेगाने पसरली. यापैकी अनेक बोटींमधून ५००० लिटरपर्यंत डिझेल वाहून नेतात. कारण मच्छिमार आठवडे समुद्रात जातात. अनेक बोटींमध्ये लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) सिलिंडर देखील भरलेले होते जे मच्छिमार स्वयंपाक करण्यासाठी वापरतात. या दुर्घटनेत एकूण ८ वेळा स्फोट झाले. हे स्फोट एलपीजी सिलिंडरचे असावेत, असे रेड्डी यांनी सांगितले. या आगीत नष्ट झालेल्या प्रत्येक बोटीची किंमत ३५ ते ५० लाख रुपयांची असल्याची माहिती त्यांनी दिली.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन